शिवसेनेसोबत मुस्लिम बांधवांच्या आग्रहामुळे सत्ता स्थापन केली- अशोक चव्हाण

146

नांदेड,दि.२१(पीसीबी) – आम्ही शिवसेनेसोबत मुस्लिमांच्या आग्रहामुळे सरकार स्थापन केलं. नाहीतर भाजप पुन्हा पाच वर्षासाठी सत्तेत आलं असतं, असं वक्तव्य सर्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचं आवाहन मुस्लिम बांधवांनी केल्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत आलो, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ते नांदेडमध्ये सीएए विरोधात आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तुमच्या महाविकास आघाडीमागे व सत्तास्थापनेमागचं हेच उद्दिष्ट होतं का?, असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

WhatsAppShare