शिवसेनेशिवाय मुंबईत १०० टक्के बंद यशस्वी करून दाखवला – संजय निरूपम

70

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेसने शिवसेनेशिवाय मुंबईत १०० टक्के बंद यशस्वी करून दाखवला, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज (सोमवार) येथे केला. इंधन दरवाढीबाबत भाजप जितकी जबाबदार आहे. तितकीच शिवसेनाही जबाबदार  आहे,  असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरूपम बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली.

मुंबईच्या व्यापारांनी बंदला पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली. याबद्दल  निरूपम यांनी त्यांचे आभार मानले. शिवसेना नेहमी सरकारच्या धोरणाविरोधात बोलण्याचे नाटक करते. ते जनतेच्या भावनेशी खेळतात. परंतु, त्यांच्या आजच्या भूमिकेमुळे पर्दाफाश झाला आहे.  शिवसेना भवनाखालील दुकानेही बंद होती, अशी  निरूपम यांनी यावेळी  सांगितले.