शिवसेनेशिवाय मुंबईत १०० टक्के बंद यशस्वी करून दाखवला – संजय निरूपम

78

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेसने शिवसेनेशिवाय मुंबईत १०० टक्के बंद यशस्वी करून दाखवला, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज (सोमवार) येथे केला. इंधन दरवाढीबाबत भाजप जितकी जबाबदार आहे. तितकीच शिवसेनाही जबाबदार  आहे,  असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरूपम बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली.