शिवसेनेपाठोपाठ आता ‘आप’कडून कंगना रनौतवर कारवाईची मागणी

47

पिंपरी, दि.१४(पीसीबी) : देशद्रोही वक्तव्य करणा-या अभिनेत्री कंगना रनौतवर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी शनिवारी (दि.13) निगडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. यापूर्वी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आज ‘आप’ पक्षातर्फे सामाजिक न्याय विंग अध्यक्ष (पुणे जिल्हा) वहाब शेख, महिला विंग अध्यक्ष स्मिता पवार-मुलाणी, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार, पिंपरी चिंचवड शहर सचिव किशोर जगताप, सामाजिक न्याय विंग अध्यक्ष (पिंपरी चिंचवड शहर) यशवंत कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘भारताला 1947 ला जे स्वातंत्र्य मिळाले होते ते भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले.’ असे देशद्रोही वक्तव्य कंगना रनौतवर हिने एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत केले होते. असे वादग्रस्त वक्तव्य करणा-या कंगनावर 504, 505 व 124 अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी ‘आप’ने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

WhatsAppShare