शिवसेनेचे शहर संघटक अमित धुमाळ यांचे निधन.

1

पिंपरी, दि. 2 (पीसीबी): शिवसेनेचे शहर संघटक तथा पिंपरी-चिंचवड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमित बाबासाहेब धुमाळ यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री उशीरा निधन झाले. मृत्यूसमयी ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते.

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे अमित धुमाळ हे चिरंजीव होत. गेल्या काही दिवसांपासून किडणी आणि हृदयाशी संबंधित आजार असल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सातत्याने प्रकृती ढासळत गेली. बाबासाहेब धुमाळ यांच्या निधनानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड ट्रान्स्पोर्ट असोसिएशनची धुरा सांभाळली होती.

WhatsAppShare