शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणार भाजपचा कार्यकर्ता

314

उस्मानाबाद, दि. १६ (पीसीबी) –  शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करणार भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा कळंब भाजप आयटी सेलचा तालुका अध्यक्ष आहे. अजिंक्य अजूनही फरार आहे. अजिंक्यने ओमराजेंच्या विरोधात फेसबूकची पोस्टही टाकल्याचे समोर आले आहे.  तसेच यावेळी शिवसेनेला नव्हे, तर राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचा उल्लेखही पोस्टमध्ये केला आहे.

‘जोपर्यंत शिवसेना संपणार नाही, तोपर्यंत उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात भाजपचा मेळ लागणार नाही, म्हणून यावेळेस घड्याळ. अरे ओमदादा तुळजापुरात युती नको, मग कळंबमध्ये कशी होणार? एक कट्टर भाजप कार्यकर्ता आता मग संजय मामाच की.’ अशी फेसबूक पोस्ट अजिंक्यने लिहिली आहे.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचार सभेत एका तरुणाने आज (बुधवार) चाकू हल्ला  केला. या हल्ल्यात निंबाळकर किरकोळ जखमी झाले आहेत.  कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे ही घटना घडली. नायगाव पाडोळी येथील प्रचार सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्याभोवती   गर्दी केली होती. या गर्दीतूनच हल्लोखोर अजिंक्य टेकाळे पुढे आला आणि त्याने निंबाळकर यांना हात मिळवत त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला निंबाळकर यांच्या डाव्या हातावरील घड्याळावर बसला. त्यामुळे सुदैवाने निंबाळकर गंभीर जखमी झाले नाहीत.

 

WhatsAppShare