शिवसेनेचा ‘शिव व्यापारी सेने’शी कोणत्याही संबंध नाही – उध्दव ठाकरे

375

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसेनेचा ‘शिव व्यापारी सेने’शी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असा खुलासा    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शिव व्यापारी सेनेच्या तक्रारी सतत उद्धव ठाकरे यांच्याकडे येत होत्या. त्यानंतर शिवसेनेचा या संघटनेशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून चिंटू शेख हा शिव व्यापारी सेनेचे काम पाहत होता. चिंटू शेखचे पाच वर्षांपूर्वीचे नितेश राणे गोळीबार प्रकरण गाजले होते. चिंटू शेखने या गोळीबारप्रकरणी नितेश राणेंविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र, नितेश राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणात क्लीनचिट मिळाली होती.

या संघटनेकडून खंडणी वसूल करणे, त्रास देणे अशा अनेक तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे येत होत्या. या संघटनेचा शिवसेनेशी संबंध असल्याचा गैरसमज अनेकांच्या मनात होता. मात्र, या संघटनेशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.