शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार निवडून आले – उद्धव ठाकरे

330

सांगली,दि.१८(पीसीबी) – दिल्लीसमोर शिवसेना कधीही झुकणार नाही. भाजपचे खासदार शिवसेना सोबत होती म्हणून निवडून आले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्याचं पालक केंद्र सरकार असलं पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

काळजी करू नका सरकार बदललं आहे. आमचं सरकार हे सूड उगवणारं सरकार नाही. आधीच्या सरकारने जे चांगलं केलं ते सुरू ठेवणार, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आमचा संघ चांगलाच उत्तम आहे. संघ म्हणजे टीम जाऊद्या नको तो वाद, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील टोला लगावा आहे.

WhatsAppShare