शिवसेना सभासद नोंदणी अभियानातून जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ..

10

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – शिवसेनेच्यावतीने सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ मावळ, पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकिची सुरवात समजून सभासद नोंदनीच्या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी शिवसैनिकांनी शाखा स्तरावर गटप्रमुख यादी त्वरित अपडेट करून सभासद नोंदणी अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाण्याचा आदेश दिला.
शिवसैनिकानी आगामी महापालिकेच्या निवडणूकीची ही सुरुवात समजून विशेषता इच्छुकांनी जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत पोहचावे व राज्यांमध्ये आपल्या सरकारने घेतलेले जनहीताचे निर्णय समजून सांगावेत व नागरीकांची राज्यशासन स्तरीय कामे असल्यास ती संकलन करून शिवसेना जिल्हाप्रमुखाकडे द्यावीत, ही कामे आपण मार्गी लावून शिवसैनिकांना सत्तेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ताकद दिली जाईल ही ग्वाही दिली. शाखा प्रमुखानी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसेना पक्षावर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून आवर्जून भेटी गाठी घ्याव्यात असे असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी प्रास्ताविक जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले व मनोगत संपर्क नेते बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, बाळासाहेब वाल्हेकर, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, विधानसभाप्रमुख अनंत कोऱ्हाळे, प्रमोद कुटे, विधानसभा संघटिका शैला खंडागळे, अनिता तुतारे, सरीता साने, माजी नगरसेवक मधुकर बाबर, महानगरपालिकेचे गटनेते राहुल कलाटे, सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

WhatsAppShare