शिवसेना लोकसभा स्वबळावर लढवणार?; संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू   

82

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी शिवसेनेने चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. गणेशोत्सावाच्या आधी उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर शिवसेनेच्या   राज्यभरातील १९ विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.