शिवतेजनगर येथे महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

162

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवतेजनगर येथील तिरंगा चौकात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शिवतेज प्रतिष्ठान, राजे शिवबा युवा मंच, विठ्ठल रुख्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, शिवतेज मित्र मंडळ आदी संस्थांच्या वतीने परिसरात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.

सर्व वयोगटातील नागरिक स्त्री पुरुष आणि मुले हातात तिरंगी झेंडे घेऊन फेरी मध्ये सहभागी झाले होते. तिरंगी झेंड्याला मानवंदना देण्यात आली. व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी “भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता” या विषयावर उपास्थितांना मार्गदर्शन केले.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका योगिता नागरगोजे, संदिपान मंगवडे, अनिल नेवाळे, बालाजी कानवटे, राजेंद्र कुलकर्णी, चंद्रकांत बावळे, नामदेव निकम, विठ्ठल दळवे, सागर गावडे, दोशी काका आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.