शिल्पा शेट्टीच्या पतीची ईडीकडुन चौकशी

475

मुंबई, दि.५ (पीसीबी) – बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे कुंद्रा आता ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले असून त्यांचा कबुलीजबाब नोंदविला जात असल्याचे सांगितले जात आहे.
बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी अमित भारद्वाज याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्याने gatbitcoin.com नावाने एक वेबसाईट तयार करून अनेकांची फसवणूक केली होती. हा घोटाळा सुमारे २ हजार कोटी एवढा असल्याचे सांगण्यात येते. राज कुंद्रा यांच्यासह बॉलिवूडचे अनेक कलाकार या बिटकॉइन योजनेला प्रमोट करत होते. त्यामुळे कुंद्रा यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात कुंद्रा दोषी आहेत की ते गुंतवणूकदार आहेत, हे अद्याप सांगता येत नाही. त्यांच्या चौकशीनंतरच सर्व बाबी उघड होतील, असे ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.