शिरुरमध्ये पत्नीच्या संशयीवृत्तीला कंटाळून पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून

934

शिरुर, दि. ११ (पीसीबी) – पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन वारंवार पतीसोबत भांडण करुन त्रास देणाऱ्या पत्नीचा पतीनेच ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास शिरूर शहराच्या मध्यवस्तीतील कुंभार आळी येथे घडली.

लता संदीपान सोळुंके (वय ३२, रा. कुंभार आळी, शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संदीपान प्रभाकर सोळुंके याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो स्वत: पोलिसांसमोर हजर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लता या पती संदीपान यांचे बाहेर अनैतिकसंबंध आहेत, असा संशय घेत होत्या. त्यामुळे पती-पत्नीत वारंवार वादावादी होत होती. रविवारी (दि.९) रात्रीही याच कारणावरून त्यांच्यात भांडणे झाली. त्यामुळे संदीपान याने पत्नीला मारहाण केली होती. त्यानंतर आज (मंगळवार) सकाळी कंपनीत कामाला जायचे असल्याने संदिपान पहाटे चार वाजताच उठले. परंतु, त्यांचा डबा बनविण्यासाठी व इतर आवराआवरी करण्यासाठी पत्नी लता या आवाज देऊनही उठल्या नाहीत. त्यामुळे संदीपान याने रागाच्या भरात पत्नी लता यांचा झोपेतच ओढणीने गळा आवळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर संदीपान यांनी स्वत: घटनेची माहिती लता यांचा भाऊ पांडुरंग कदम आणि त्यांच्या नातेवाईकांना दिली. तसेच पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.