शिरीष कुलकर्णी यांच्या अडचणीत वाढ; ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

64

पुणे, दि. २ (पीसीबी) – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण त्यांच्या पोलिस कोठडीत ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके दाम्पत्य, त्यांच्या मुलगा आणि इतर १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, शिरीष यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.  मात्र त्यामध्ये वाढ करण्यात आली असून त्यांना ५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, शिरीष यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला असता तो तात्पुरता न्यायालयाने मंजूर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शिरीष यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे शिरीष यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.