शिरगाव येथील तीन दारुच्या भट्ट्या उध्वस्त; तळेगाव पोलिसांची कारवाई

86

तळेगाव, दि. १२ (पीसीबी) – शिरगाव जवळील पवना नदीच्या किणारे सुरु असलेल्या तीन गावठी दारुच्या भट्ट्या तळेगाव पोलिसांनी उध्वस्त करुन पाच जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.११) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांना शिरगावातील पवना नदी किनारी दारू भट्ट्या सुरु असल्याची माहिती मिळाली होती. यावर तळेगाव पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून दारुच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. तसेच  हजारो लिटर गावठी दारू बनविण्याचे रसायन आणि तयार गावठी दारू नष्ट केली. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तर इतरांचा शोध सुरु आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक पवार, सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक बाजगिरे यांच्या पथकाने केली.