शितळानगर येथे 75 हजारांची घरफोडी

58

देहूरोड, दि. २२ (पीसीबी) – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 75 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी शितळानगर, देहूरोड येथे उघडकीस आली.

याप्रकरणी कृष्णमूर्ती सिद्धप्पा मलाप्पा (वय 62, रा. गुलमोहर सोसायटी, शितळानगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 18) सकाळी आठ ते शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान फिर्यादी कृष्णमूर्ती यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 70 हजार 500 रुपयांचे 80 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार हजार 500 रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण 75 हजारांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare