शिक्षिका असलेल्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पिंपरी, संत तुकारामनगरमधील सासरकडच्या मंडळींना अटकपूर्व जामीन

116

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) –  शेअर मार्केट ट्रेडींग कंपनीत मॅनेजर पदावर कामाला असल्याचे सांगून लग्न करून  फसवणूक केली. तसेच वंशाला दिवाम्हणून मुलगा हवा असल्याच्या कारणावरुन शिक्षिका असलेल्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. हा प्रकार मार्च २०१४ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान पिंपरीतील संत तुकारामनगर येथे घडला.

याप्रकरणी एका ३० वर्षीय विवाहित शिक्षिकेने पती अविनाश भगवान निकम, सासरे भगवान दिनकर निकम, सासू शालन भगवान निकम तसेच डॉ.ज्योती भगवान निकम, दिपक भगवान निकम, सारिका दिपक निकम, डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर (सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी) आणि डॉ.मनिषा राजेंद्र खेडेकर (रा. नारायण पेठ, पुणे) यांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शिक्षिका आहे. पीडितेचा २०१४ मध्ये संत तुकारामनगर येथील अविनाश निकम यांच्यासोबतमोठ्या थाटामाटात विवाह झाला. लग्नापूर्वी अविनाश हा पुण्यातील निर्मल बंग सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या शेअर मार्केट ट्रेडींग कंपनीमध्येमॅनेजर म्हणून नोकरीस असल्याचे खोटे पीडित महिलेला व तिच्या कुटुंबियांना सांगण्यात आले होते. लग्नानंतर पीडितेला आपली फसवणूकझाल्याचे लक्षात आले. तसेच पतीला व्यवसाय करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असा पीडितेला तगादा लावला.

लग्नानंतर पिडीतेला एक मुलगी झाली. वंशाला मुलगाच हवा म्हणून निकम कुटुंबियांनी महिलेचा अतोनात छळ केला. तसेच डॉ. राजेंद्र खेडेकर व डॉ.ज्योती भगवान निकम या दोघांनी संगनमताने १७ ते २५ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान पुण्यातील वारजे माळवाडी येथील विनायक हॉस्पिटलमध्येबळजबरीने घेऊन जाऊन किडनी स्टोन ऑपरेशनच्या नावाखाली आपला गर्भपात केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे. तसेच पीडितेने तिच्या पैशांचा व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा निकम व खेडेकर कुटुंबियांनी स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर केल्याचाही जबाब दिलाआहे.

याप्रकरणी पोलिसांनी पती अविनाश भगवान निकम, सासरे भगवान दिनकर निकम, सासू शालन भगवान निकम तसेच डॉ. ज्योती भगवान निकम, मनिषा राजेंद्र खेडेकर, डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी न्यायलायाकडून अटकपूर्व जामीन घेतला. त्यानंतरयाप्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना पोलिसांनी या सर्वांना नॉमिनल अटक केल्याचे दाखविले आहे. तर दिपक भगवान निकम आणिसारिका दिपक निकम हे दोघेही परदेशात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.