शिक्षक दाम्पत्याकडून 42 वर्षीय महिलेचा विनयभंग

122

सांगवी, दि. ९ (पीसीबी) – ‘सार्वजनिक नळाला पाईप लावल्याने आम्हाला पाणी मिळाले नाही’ असे म्हटल्याने शिक्षक दाम्पत्याने 42 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी सांगवी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी शिक्षक दाम्पत्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्जे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षक दाम्पत्याचे नाव आहे (पूर्ण नाव माहीत नाही). याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी शिक्षकांना ‘तुम्ही सार्वजनिक नळाला पाईप लावल्याने आम्हाला पाणी मिळाले नाही’ असे म्हणाल्या. याचा राग आल्याने दाम्पत्याने महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, फिर्यादी महिलेच्या मुलांना देखील आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

WhatsAppShare