शिक्रापूरमध्ये बसच्या धडकेत सव्वा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

195

पुणे, दि. १ (पीसीबी) – स्कूल बसने दिलेल्या धडकेत सव्वा वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी आठच्या सुमारास शिक्रापूर येथे घडली.

श्रध्दा एकनाथ दिरघट्टी (वय सव्वा वर्ष, रा. शिक्रापूर, पुणे) असे बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास सव्वा वर्षांची श्रध्दा  तिच्या आईसोबत मोठ्या बहिणीला स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी गेली होती. इतक्यात श्रद्धा बसच्या समोर गेली. बस ड्रायवरला ती दिसली नाही आणि त्याने गाडी पुढे घेतली असता श्रद्धाला बसची धडक बसली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. शिक्रापूर पोलिस तपास करत आहेत.