शिक्रापूरमध्ये पतीला दारु पाजून पत्नीवर केला बलात्कार

4119

पुणे, दि. २ (पीसीबी) – पुणे-अहमदनगर रस्त्यावरील शिक्रापूरजवळ हॉटेल कैलास येथे नवदांपत्याला पार्टी देण्याचा बहाणा करून पतीस दारू पाजून,  त्याच्या पत्नीवर एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२९ जुलै) दुपारच्या सुमारास शिक्रापूरजवळ हॉटेल कैलास येथे घडली.

याप्रकरणी पीडित १५ वर्षीय विवाहितेने दोघांविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता नवविवाहित मुलगी ही १५ वर्षांची आहे. रविवारी ओळखीच्या दोघाजणांनी तिला व तिच्या पतीस लग्नाची पार्टी देतो, असे सांगून शिक्रापूरजवळील हॉटेल कैलास  येथे नेले होते. त्या ठिकाणी एका खोलीत पीडितेच्या पतीस आरोपींनी दारू पाजली. तसेच मुलीला दुसर्‍या खोलीत नेत दुसऱ्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार झाले आहेत. शिक्रापूर पोलिस तपास करत आहेत.