‘शाह ज्यादा खा गया’; राहुल गांधीचा अमित शहांवर निशाणा

214

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – “अभिनंदन, अमित शाह जी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सरकारी बँक, तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या बाबतीत पहिला पुरस्कार जिंकला आहे. पाच दिवसात ७५० कोटी! लाखो भारतीयांचे आयुष्य नोटाबंदीमुळे उद्ध्वस्त झाले, तुमच्या या कामगिरीला सलाम,” असे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

नोटाबंदीनंतर जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याबाबत राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही माहिती आरटीआयअंतर्गत मिळाल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

यावर राहुल गांधींनी अमित शाहांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजप नेते अनेकदा राहुल गांधींना ‘शहजादा’ म्हणून टोमणे मारतात. तोच धागा पकडून राहुल गांधींनी ‘शाह ज्यादा खा गया, असा हॅशटॅग वापरुन निशाणा साधला आहे.

WhatsAppShare