शासनाकडील अधिकारी नको – कर्मचारी महासंघाची आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी

7

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – शासकीय अधिकारी महापालिका सेवेत प्रशासन अधिकारी पदावर रूजू करून घेऊ नये, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी अभिनामाची २६ पदे मंजूर असून सदरची पदे कार्यालयीन अधिक्षक पदावरील कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने अथवा सरळसेवेने भरणे आवश्यक आहे. परंतु सद्यस्थितीत प्रशासन अधिकारी या पदावर राज्य शासनाकडून काही अधिकारी हे मनपा आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्यात येणार असल्याचे समजते, असे चिंचवडे यांनी म्हटले आहे.

अधिकाऱ्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात येऊ नये. प्रशासन अधिकारी हे महापालिका स्तरावरील पद आहे. त्या पदावर शासनाकडील अधिकाऱ्याची नेमणूक केल्यास महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे रिक्त असलेल्या प्रशासन अधिकारी या पदावर महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांमधून सदर जागा तातडीने भरण्यात याव्यात, अशी सुचना चिंचवडे यांनी केली आहे. पालिका कर्मचाऱ्याव्यतिरिक्त शासनाकडील अधिकारी पालिका सेवेत प्रशासन अधिकारी पदावर रूजू करून घेतल्यास कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल व त्यामुळे काही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असे चिंचवडे यांनी आयुक्तांना सांगितले.

WhatsAppShare