शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे जावे – प्रकाश जावडेकर

76

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. काही शाळा सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येतात आणि आर्थिक मदत मागतात. ते खरंतर माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागू शकतात. आपल्या शाळेला वा महाविद्यालयाला मदत करणे हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे, जनप्रबोधिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जावडेकर म्हणाले.