शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना गौरव पुरस्कार

126

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – देशसेवेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना राज्य सरकारने मरणोत्तर गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हा सैनिक अधिकारी प्रांजळ जाधव यांनी बुधवारी या पुरस्काराच्या सहा लाख रुपये रकमेचा धनादेश मेजर राणे यांच्या पत्नी कनिका यांच्याकडे मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी सुपूर्द केला. यावेळी कौस्तुभ राणे यांचे वडील प्रकाशकुमार राणे हेही उपस्थित होते.

काश्मीरमधील गुरेज क्षेत्रामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईदरम्यान मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले होते.