शहिद संतोष बाबू यांच्या मुलीचा ह्रदय पिळवटून टाकणारा फोटोवर विरेंद्र सहेवाग म्हणाला…

643

हैद्राबाद, दि. १७ (पीसीबी) – चीनच्या मुजोरीनंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (३७) यांच्यासह २० भारतीय जवानांना वीरमरण आले. कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहिद वडिलांच्या फोटोसमोर उभी असलेली सहा वर्षांची चिमुकली पाहून प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

अशातच चीनच्या या मुजोरीचा भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने चांगलाच समाचार घेतला. गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षात भारताचे काही जवान शहीद झाल्यानंतर सेहवागने आपला चीनवरील रोष व्यक्त केला. “कर्नल संतोष बाबू यांनी दिलेल्या बलिदानासाठी त्यांना सलाम. एकीकडे संपूर्ण जग करोनासारख्या अतिशय भयानक व्हायरसशी लढत असतानाच चीनकडून अशा प्रकारे वर्तणूक योग्य नाही. मला आशा वाटते की चीनने लवकर सुधरावं”, अशा शब्दात सेहवागने आपला राग व्यक्त केला