शहर परिसरात आणखी आठ चो-या; चार दुचाकींसह मोबाईल, दागिने लंपास

58

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहर परीसरात चोरीच्या आणखी आठ घटना उघडकीस आल्या आहेत. एमआयडीसी भोसरी, पिंपरी, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी, चाकण, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या असून यात मोबाईल फोन, रोख रक्कम, सोने, डायमंडचे दागिने, दुचाकी, पाण्याची मोटर, वायर असा एकून दोन लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

एमआयडीसी भोसरी परिसरात एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून 11 हजार 200 रुपयांचा मोबाईल फोन आणि रोकड चोरट्यांनी चोरुन नेली. काळभोर नगर येथे एका महिलेच्या गळ्यातील 40 हजारांची सोनसाखळी एका अनोळखी चोरट्याने चोरुन नेली.

देहूरोड परीसरातील रावेत येथे एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी 92 हजारांचे सेने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली आहे. तळेगाव एमआयडीसी, चाकम, हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी चार दुचाकी चोरुन नेल्या आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यात चोरट्यांनी पाण्याची मोटर, वायर असा एकून 10 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. सर्व घटनांमध्ये दोन लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

WhatsAppShare