शहर परिसरातून आणखी सहा वाहने चोरीला

111

चाकण, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून आणखी सहा वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा हजारांची एक दुचाकी चोरीला गेली आहे. आकाश दिलीप शिंदे (वय 30, रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. चिखली परिसरातून पंधरा हजारांची एक दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी सतीश शंकर नागावकर (वय 46, रा. घरकुल चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिखलीमध्ये आणखी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. संदीप शिवाजीराव पाटील (वय 32, रा. जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांची 40 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. बावधन येथून वीस हजारांची एक दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी सौरभ सुनील मडके (वय 21) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चाकण परिसरातून अनुक्रमे 20 आणि 35 हजारांच्या दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी महेंद्र राजाराम नेहरे (वय 44, रा. कडूस, ता. खेड) आणि दत्तात्रय शिवाजी कराळे (वय 38, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.