शहरात सायंकाळी 7 ते सकाळी 7 असा जनता कर्फ्यू लागू करा कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी उपमहापौर तुषार हिंगे यांची सूचना

45

पिंपरी, दि.30 (पीसीबी) – लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिक रस्ते, बाजारपेठे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. परिणामी, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगात वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहरात सायंकाळी 7 ते सकाळी 7 यावेळेत सक्तीने जनता कर्फ्यू लागू करावा, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना सोमवारी (दि.29) निवेदन दिले आहे. शहरात दोन महिने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यात महापालिका व पोलिस प्रशासनाला चांगले यश आले. मात्र, टप्पाटप्पाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिक रस्ते, बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी होत नाही. नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. ही धोक्याची घंटा आहे, अशी चिंता उपमहापौर तुषार हिंगे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काळात शहरात सायंकाळी 7 ते सकाळी 7 यावेळेत जनता कर्फ्यू लागू करावा. त्याची कडक अंमलबजावणी करावी. विक्रेते, व्यावसायिक व दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगबाबत सक्त सूचना द्याव्यात. विनामास्क फिरणारे. तंखाबू, गुटखा खाऊन थुंकणार्‍यांवर कारवाई करावी, असा सूचना तुषार हिंगे यांनी केल्या आहेत.

 

                                 

WhatsAppShare