शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच; अजंठा नगरमध्ये १० वाहनांची तोडफोड

140

निगडी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात काय केल्या वाहन तोडफोड थांबण्याचे नाव घेत नाहीए. शहरातील निगडी अंजठानगर पूर्णवसन इमारती खाली उभ्या असलेल्या तब्बल १० वाहनांची तोडफोड करण्यात आला आहे. शनिवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास दोन मित्रांमधे झालेल्या वादातून ८ ते १० जणांच्या टवाळखोरांनी परिसरातील इमारती खाली उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री संतोष पवार आणि गायकवाड (पूर्ण नाव समजु शकले नाही) नामक दोन मित्रांमध्ये वाद झाला होता. यातून संतोष हा शनिवारी रात्री अजंठानगर येथे राहत असलेला गायकवाड याला मारण्यासाठी त्यांच्या ८ ते १० साथीदारांना घेऊन आला. मात्र संतोष याला गायकवाड सापडला नाही. यामुळे संतोष आणि त्याच्या साथीदारांनी निगडीतील अंजठानगर पूर्णवसन इमारती खाली उभ्या असलेल्या तब्बल १० वाहनांची तोडफोड केली. यामध्ये कार आणि रिक्षांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

दरम्यान घटनेचा व्हिडीओ देखील निगडी पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिस त्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.