शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट; भोसरी, हिंजवडीतून तब्बल ‘एवढ्या’ दुचाकी चोरीला

27

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. संचारबंदीच्या काळातही चोरटे वाहनांची चोरी करत आहेत. भोसरी आणि हिंजवडी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत सोमवारी (दि. 26) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रवीण रमेश कांबळे (वय 31, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी क्यू 4947) अज्ञात चोरट्यांनी राहत्या घरापासून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

सचिन विक्रम कांबळे (वय 35, रा. कपीलनगर, म्हाळुंगे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 12 / जी एच 5813) चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेअकरा वाजता घडली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare