शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरुच; पोलीस…

37

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरातून चोरलेल्या दुचाकी मराठवाडा, खान्देशात विक्रीसाठी पाठविणा-या टोळीकडून 61 दुचाकी जप्त केल्यानंतरही पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना सुरूच आहेत. चाकण येथून एक दुचाकी, पिकअप आणि दिघीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे.

चाकण, खराबवाडीतील घटनेप्रकरणी बापु कैलास कड (वय 27) यांनी चाकण म्हाळुंगे पोलीस चौकीत तक्रार दिली. कड यांनी शुक्रवारी सिल्वर रंगाची यामाहा कंपनीची एमएच 14 एच ए 7000 ही दुचाकी घरासमोर हॅन्डल लॉक करुन पार्क केली होती. मध्यरात्री चोरट्यांनी 40 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेली. चाकण पोलीस तपास करत आहेत.

तर, चाकण येथील दुस-या घटनेत पिअकप चोरीला गेली. 1 लाख 45 हजार रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप एमएच 14 ई एम 7985 लॉक करुन पार्क केली होती. चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरुन नेली. याप्रकरणी ओमप्रकाश सुजाराम जाट (वय 42, रा. आळंदीरोड, मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर, दिघीतील महादेव दिगंबर गुरव (वय 28) यांनी शुक्रवारी हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी घरासमोर पार्क केली होती. मध्यरात्री चोरट्याने 30 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

WhatsAppShare