शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण

70

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट असून हिंजवडीत लॅपटॉप आणि तळेगाव दाभाडे येथे मोबाईल चोरीची घटना उघडकीस आली.

हिंजवडीतील घटनेप्रकरणी आशिष अंजनी यादव (वय 23, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यादव यांच्या राहत्या घराचा दरवाजा शनिवारी रात्री दीड ते सकाळी 11 या कालावधीत उघडा होता. त्या वेळेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातून 15 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला.

तर, कल्पेश गणेश सपकाळे (वय 23, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या रुममधून आठ हजारांचा मोबाइल आणि 50 हजार रुपयांचे दोन लॅपटॉप चोरून नेले. याप्रकरणी तळेगाव पोलीस तपास करत आहेत.

पराग अरविंद कुलकर्णी (वय 33, रा. फुगे माने आळी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दत्ता गोरक्षनाथ भगत (वय 31, रा. जाधववाडी, चिखली, मूळ रा. लिमगाव धावडी, ता. खेड, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली. फिर्यादी हे डॉक्टर आहेत. मोशी येथील संतनगर येथे साईनाथ हॉस्पिटल समोरील पार्किंगमध्ये फिर्यादीने रविवारी त्यांची दुचाकी लॉक करून पार्क केली होती. दत्ता भगत हा ती दुचाकी चोरी करून घेऊन जात होता. सुरक्षारक्षकाने भगत याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला.

WhatsAppShare