शहरात घरफोड्यांच्या घटनेत वाढ

38

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : शिंदेवस्ती, रावेत येथे एका घरात घरोफोडी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 23) मध्यरात्री एक वाजता उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.

स्मिता अनंत ढुमणे (वय 28, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. निघोज, ता. पारनेर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शुक्रवार (दि. 19) पहाटे पाच ते मंगळवार (दि. 23) मध्यरात्री एक वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप, कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून 18 ग्रॅम सोन्याचे दागिने, डायमंडच्या कानातील रिंग आणि रोख रक्कम असा एकूण 92 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare