शहरातील ‘या’ वर्दळीच्या परिसरातून तीन दुचाकी आणि कारचा सायलंसर चोरीला

21

चाकण, दि. २ (पीसीबी) – चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक दुचाकी आणि एका कारचा सायलंसर चोरून नेला. तर एमआयडीसी भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल प्रकाश देव (वय 32, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी देव यांनी त्यांची इको कार (एम एच 14 / ए एच 9780) 29 एप्रिल रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कारचा 12 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर काढून चोरून नेला. हा प्रकार 30 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आला.

कृष्णा जयराम मोरे (वय 30, रा. सुभाषवाडी, निघोजे) यांनी दुचाकी चोरीबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एम एच 14 / ई क्यू 1797) 30 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता व्हेराक कंपनीच्या बाहेर पार्क केली. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ते कंपनीतून बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

राकेश चंद्रकांत चव्हाण (वय 39, रा. गायकवाड नगर, दिघी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चव्हाण 28 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल येथे कामासाठी गेले. त्यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी स्पाईन सिटी मॉल येथील आईजी सुपरशाॅपी समोर पार्क केली. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काम संपवून ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

विठ्ठल आत्माराम देसले (वय 40, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी देखील एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / सीबी 0992) अज्ञात चोरट्यांनी संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, मोशी येथून चोरून नेली. हा प्रकार 27 एप्रिल रोजी सकाळी सात ते रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

WhatsAppShare