शहरातील ‘या’ गर्दीच्या ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकांचे छापे

58

शाहूनगर, दि. २० (पीसीबी) – सामाजिक सुरक्षा पथकाने शाहूनगर येथील दोन तर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मोशी येथील एका जुगार अड्ड्यावर सोमवारी (दि. 19) छापे मारून कारवाई केली. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन लाख 17 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

केएसबी चौक, शाहूनगर येथील वैभव कॉम्प्लेक्स मधील सत्यम मार्केट गाळा नंबर पाच येथे सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाने पहिली कारवाई केली. या व्हिडीओ पार्लरमध्ये एक रुपयाला 30 रुपये याप्रमाणे जुगार सुरू होता. या कारवाईत एक लाख रुपयांच्या 10 व्हिडीओ गेम मशीन, 3 हजार 590 रुपये रोख रक्कम असा एक लाख तीन हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी व्हिडीओ गेम पार्लर मालक अभिजित राजेंद्र सोळंके (वय 32, रा. काळेवाडी), जुगार खेळी सुरेश महादू ठाकूर (वय 51, रा. कुदळवाडी), जुगार खेळी अमोल दिलीप वायकर (वय 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाने दुसरी कारवाई केएसबी चौक, शाहूनगर येथील वैभव कॉम्प्लेक्स मधील सत्यम मार्केट गाळा नंबर सहा येथे केली. या कारवाईत एक लाख रुपयांच्या 10 व्हिडीओ गेम मशीन, 800 रुपये रोख रक्कम असा एक लाख 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुसऱ्या कारवाईत व्हिडीओ गेम पार्लर मॅनेजर अजित संभाजी जाधव (वय 21, रा. मोहननगर, चिंचवड), कामगार आदेश बाळाजी जाधव (वय 20, रा. निगडी), जुगार खेळी नितीन ज्ञानोबा मोरे (वय 40, रा. चिखली), जुगार खेळी सागर विजय महापुरे (वय 35, रा. चिंचवड), किरण विठ्ठल साळुंखे (वय 26, रा. मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे ओम गुरुदत्त व्हिडीओ गेम पार्लर येथे केली. एक रुपयाला 15 रुपये असा जुगार खेळत असताना पोलिसांनी कारवाई केली. त्यात पोलिसांनी एक लाख 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी बाळगोंडा पायगोंडा पाटील (वय 40, रा. धानोरीगाव, पुणे), दिनेश सूर्यभान भोळे (वय 27, रा. कुरुळी), श्रीनिवास चंद्रकांत त्रिंबके (वय 28, रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

WhatsAppShare