शहरातील महापुरूषांचे पुतळे महिन्याला पाण्याने धुवून स्वच्छ करावेत; महापौर उषा ढोरेंकडे निवेदन

91

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड शहरातील अनेक महापुरूषांचे अर्धाकृती व पुर्णाकृती पुतळे उभारण्यात आले. मात्र जयंती किंवा पुण्यतिथी असल्यावरच महापुरूषांच्या पुतळ्याची स्वच्छता केली जाते. इतर दिवस धुळ व पुतळ्याशेजारील अस्वच्छता तशीच राहते. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व महापुरूषांची पुतळे प्रत्येक महिन्याला पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात यावी अशी मागणी आखिल भारतीय छावा संघटनेनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली आहे.

यावेळी पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष गणेश जाधव, कार्याध्यक्ष संतोष पाटील, राजु धुरंदरे, नेहे पाटील, आप्पा चांदवडे, राहुल माने, लक्ष्मण बिडवे, अजय लखणे, संतोष शिंदे अदी उपस्थित होते.