शहरातील नामांकित कंपनीत नोकरी लावून देतो; असे म्हणत केली ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक

78

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – फोर्स मोटर्स कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून या तिघांनी मिळून एका तरुणाची एक लाख 44 हजारांची फसवणूक केली. ही घटना 26 सप्टेंबर 2020 ते 25 मार्च 2021 या कालावधीत थरमॅक्स चौक चिंचवड येथे घडली.

पलाश गणेशराव मौजे (वय 28, रा. सहकार नगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत रविवारी (दि. 25) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक जाधव उर्फ यादव (वय 40), जीवन गायकवाड (वय 35), पाटील (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही, वय 38) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी पलाश मौजे यांना फोर्स मोटर्स कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी वारंवार आरोपींनी पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना गुगल पे आणि फोन पे वरून ऑनलाईन माध्यमातून एक लाख 44 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर फिर्यादी पलाश यांनी आरोपींकडे नोकरीबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांना नोकरी न लावता, पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare