‘शहराच्या इतिहासात भिकु वाघेरे पाटील यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहीले जाईल’: खा. श्रीरंग बारणे

55

 – शहराला गावपण जपून आधुनिक चेहरा भिकु वाघेरे यांनी दिला…..महापौर माई ढोरे
 – डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) पिंपरी चिंचवड शहराचा सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय इतिहास जेंव्हा लिहीला जाईल तेंव्हा दिवंगत महापौर भिकु वाघेरे पाटील यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहीले जाईल, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

गावांचे गावपण जपून पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक चेहरा देण्याचे काम दिवंगत महापौर भिकु वाघेरे पाटील यांनी केले. त्यावेळी उपमहापौर म्हणून महंमदभाई पानसरे व इतर नगरसेवकांनी त्यांना खंबिरपणे साथ दिली त्यामुळे आज विकसित, सुनियोजित शहर म्हणून पिंपरी चिंचवडचे नाव घेतले जाते, असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले.

कै. भिकु वाघेरे (पाटील) यांच्या 35 व्या स्मृतीदिनानिमित्त महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर नवमहाराष्ट्र विद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन उपमहापौर हिरानानी घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महात्मा फुले पगडी, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ आणि रोख अकरा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेस ‘रोटी मेकर मशिन’ (चपाती बनविण्याचे यंत्र) देण्यात आले. यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलित बाटल्या पीएसआय ब्लड बँकेस देण्यात आल्या.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका सुमनताई पवळे, उषाताई वाघेरे, निकिता कदम, श्रीमती शांती सेन, शामाताई शिंदे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महंमदभाई पानसरे, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, रंगनाथ कुदळे, संतोष कुदळे, विजय लोखंडे, माधव पाटील, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, नितीन नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघेरे, उद्योजक विजय काटे, दिलीप देवकर, वर्षा जगताप, गंगाताई धेंडे, सारिका पवार, जयवंत शिंदे, हभप अंकुश महाराज वाघेरे, विजय महाराज कुदळे, आण्णासाहेब कापसे, पोपट महाराज इंगळे, वस्ताद दत्तोबा लक्ष्मण नाणेकर, नथूभाऊ शिंदे, मोरेश्वर मासूळकर, बाजीराव नाना चांदिले, शारदा मुंडे, बिपीन नाणेकर, विशाल वाकडकर, फझल शेख, विशाल काळभोर आदींसह पिंपरीगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. रोहन काटे म्हणाले की, कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमितपणे व्यायाम करुन वेळेवर जेवण, वेळेवर झोप घ्यावी. कोरोना कोविड -19 ची तीसरी लाट येईल का नाही माहित नाही, परंतू त्या दृष्टीने नियोजन व काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सॅनिटायझर वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवून राहणे. शक्य असेल तेवढे घरी थांबा सुरक्षित रहा. या नियमांचे पालन करावे.

प्रास्ताविक संजोग वाघेरे पाटील, सुत्रसंचालन योगेश कोंढाळकर आणि आभार सोमनाथ कुदळे यांनी मानले.

WhatsAppShare