शरिरसंबंध ठेवताना पती कृत्रिम अवयव वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार; भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1231

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून शरिरसंबंध ठेवताना पती कृत्रिम अवयव वापरत असल्याची धक्कादायक तक्रार पत्नीने भोसरी पोलिसात केली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात पती, सासू, चुलत सासरे, चुलत सासू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार या चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील माहेर असलेल्या युवतीचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मधील युवकाशी तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पती लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच शरीरसंबंध ठेवताना कृत्रिम अवयवाचा वापर करत होता. शरीर संबंध ठेवण्यासाठी तो सक्षम नव्हता, अशी तक्रार पत्नीने भोसरी पोलिस ठाण्यात केली आहे. पती-पत्नी सध्या वेगवेगळे राहात आहेत. पती कन्नड येथील असल्याने पुढील तपास करण्यासाठी तक्रार अर्ज कन्नड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

WhatsAppShare