शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करा!

2119

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दोन वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करण्यास सांगितले होते. त्यामुळे, शरद पवार यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर तब्बल दोन वर्षाने आज (शुक्रवारी) उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या दोन वेगवेगळ्या तारखा आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा, असे शरद पवार यांनी दोन वर्षापुर्वी म्हटले होते. याविरोधात मुंबई उच्च ‌न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, त्यावेळी हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना याचिकेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला होता. आता मात्र या याचिकेवर आज (शुक्रवारी) सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.