शरद पवारांनी पक्षातील नेत्यांची सोमवारी महत्त्वाच्या विषयावर बोलावली बैठक    

372

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता बोलावली आहे. या बैठकीत नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी झालेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

या बैठकीला राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर आदी उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.   सनातन संस्थेशी संबंधित व्यक्तीचे अटकसत्र, नालासोपारा-साताऱ्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ निघणारे मोर्चे यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.