शरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचे काम; शिवसेना आमदारांची संतप्त प्रतिक्रिया

60

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांची मराठा आरक्षणप्रश्नी चर्चेत मध्यस्थी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घटनादुरुस्तीचे विधान यावरुन शिवसेनेचे आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. शरद पवार हे आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली .