शबाना आजमींना रेल्वे बाबतची चुकीची पोस्ट करणे पडले महागात; मागावी लागली जाहिर माफी

109

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – भारतीय रेल्वे प्रशासनाबाबतची चुकीची पोस्ट ट्विटरवर टाकल्याने ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना भारतीय रेल्वेची जाहिर माफी मागावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शबाना आजमी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरुन एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये कर्मचारी घाणेरड्या पाण्यात प्लेट्स धुत होते. हे कर्मचारी भारतीय रेल्वेचे आहेत असे समजत शबाना आजमी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनाही टॅग केले होते. सोमवार (दि.४) सकाळी शबाना आजमी यांनी व्हिडीओ पोस्ट करत पियूष गोयल यांना पाहण्याचे आवाहन केले होते.

त्याच दिवशी संध्याकाळी रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण देत, मॅडम हा व्हिडीओ मलेशिअन रेस्टॉरंटमधील असल्याचे रेल्वे मंत्रालायने ट्विटरला रिप्लाय देत शबाना यांची चुक लक्षात आणून दिली. यावेळी त्यांनी एका बातमीची लिंकही देखील सोबत शेर केली. यानंतर लगेचच आपली चूक लक्षात येताच शबाना आजमी यांनी ट्विटरवर जाहिररित्या रेल्वे प्रशासनाची माफी मागितली.