शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची – पंकजा मुंडे

181

बीड,दि.१४(पीसीबी) – अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ दिली हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला. शपथ मुलींना का आणि ती ही प्रेम न करण्याची…,असा सवाल भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रेम, प्रेम विवाह आणि हुंडा घेऊन लग्न करणार नाही अशी शपथ घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. या प्रकारामुळे राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पंकजा मुंडे यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही देणार, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही..वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार, असंही त्या म्हणाल्या आहेत.

WhatsAppShare