शनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात; महिलांनाही चौथऱ्यावर प्रवेश

72

नागपूर, दि. १९ (पीसीबी) – अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिर राज्य सरकारच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  शनी मंदिराच्या चौथऱ्यावर आता महिलांनाही जाण्याचा अधिकार मिळणार आहे. कारण राज्य सरकारने विधानसभेत यासंदर्भातील विधेयकाला मंजुरी दिली आहे.  

शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक २०१८ विधानसभेत बुधवारी रात्री १२.३० वाजता मंजूर करण्यात आले. त्यामुळे सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करुन नवीन अधिनियमाद्वारे शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहे.

देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याबरोबरच भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हा स्वतंत्र कायदा करण्यात आला आहे.

शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. सध्याच्या  विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता.  त्यामुळे सरकारने या विधेयकाला मंजुरी दिली आहे.