शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पाणीपुरवठा अधिकार्यां सोबत चर्चासत्र

164

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने पिंपळे सौदागर परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा समस्येवर पालिका पाणीपुरवठा अधिकारी यांच्या सोबत चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक सोसायटीच्या सदस्यांना व राहिवासीयांना आपले समस्या मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासूनच श्री शत्रुघ्न काटे यांनी सतत पिंपळे सौदागर परिसरातील पाणी पुरवठा समस्येबाबत पालिका प्रशासनासोबत पत्र व्यवहार केले होते आणि परिस्थिती मध्ये सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता. या पाश्र्वभूमीवर श्री. शत्रुघ्न काटे यांनी पालिका पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब आणि परिसरातील नागरिकांची बैठकीचे आयोजन केले होते . याबैठकीत उपस्थित राहिवासीयांनि आपापल्या प्रश्न मांडले व सुर्यवंशी साहेबांनी त्यांची सविस्तरपणे माहिती दिली आणि पाणीपुरवठा करत असताना ज्या काही तांत्रिक अडचणी येतात त्याबाबत ही नागरिकांना माहिती दिली.

श्री. शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्याने अमृत योजने अंतर्गत अण्णासाहेब मगर शाळा परिसर आणि राजमाता जिजाऊ उद्यान याठिकाणी दोन नवीन पाण्याच्या टाकी बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपळे सौदागर परिसरात नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी साठवणूक क्षमता फार कमी असल्याचे लक्षात आले असता श्री. बापु काटे यांनी प्रामुख्याने या दोन नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी प्राध्यान दिले आणि सतत याबाबत पाठपुरावा केला आणि अखेर अमृत योजने अंतर्गत या दोन नवीन टाक्यांचे काम सुरू करून घेतले आणि लवकरात लवकर सदर दोन्ही टाक्या कार्यान्वित करण्यात यावे अशी प्रशासनास विनंती केली.