शंकर जगताप, सीमा सावळे, सारंग कामतेकर यांच्याकडून डॉ. नीलम गोऱ्हेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; राजकीय चर्चांना उधाण

162

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व भाजपच्या अभ्यासू व आक्रमक ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, माजी नगरसेवक तसेच भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी बुधवारी (दि. १२) भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.