व्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा उपलब्ध होणार

25

मुंबई, दि.१ (पीसीबी) – ग्रुपसोबत पिकनिक किंवा हॅँगआऊटचा प्लॅन करायचा असेल, तर चर्चेसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटिंगटा ऑप्शन बरा पडतो. मात्र ग्रुपमध्ये टायपिंग करुन बोटे दुखत असल्यास आता तुम्हाला ग्रुप व्हिडिओ कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या यूझर्ससाठी हा नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

सर्वात आधी ज्यांना व्हिडीओ कॉल करायचे आहे. त्या युजरचे चॅट ओपन करा. चॅट ओपन केल्यांनतर व्हिडीओ कॉलिंग बटनावर क्लिक करा. त्यानंतर व्हिडीओ कॉल रिस्विव्ह करेपर्यंत वाट पहा. एकदा पहिल्या युजरने कॉल रिसिव्ह केल्यानंतर तुम्ही इतर दोन युजर्सना कॉल करु शकता. यासाठी तुम्हाला अॅड कॉन्टॅक्टवर क्लिक करावे लागणार आहे. नाव सर्च करुन तुम्हाला कॉल करायचे आहे. त्या युजरचे नाव अॅड करा. तिसऱ्या आणि चौथ्या युजरला जोडल्यानंतर त्याबाबतचे नोटीफिकेशन इतर दोन युजर्सना जाईल.

व्हॉट्सअॅप यूझर्स सध्या दररोज दोनशे कोटी मिनिटे व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलवर व्यतित करतात. ग्रुप कॉल एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतील, याची हमी व्हॉट्सअॅपने दिली आहे.