व्यायामाला गेलेल्या तरुणांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

117

बीड, दि. २० (पीसीबी) – व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना वाहनाने उडवल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे. कल्याण विशाखापट्टनम राष्ट्रीय महमार्गावर हा अपघात झाला.

अपघातात मृत्यू पावलेले तिघेही तरुण गेवराईतील तळेवाडी येथील रहिवासीआहेत. अभिषेक भगवान जाधव (वय १४), सुनील प्रकाश थोटे (वय १४), तुकाराम विठ्ठल यमगर (वय १६) अशी त्यांची नावे आहेत.