व्यवसायिकाची अडीच कोटींची फसवणूक

56

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – व्यावसायिक आणि त्यांच्या मित्रांकडून व्यवसायाच्या बहाण्याने पैसे घेऊन ते परत न करता तब्बल दोन कोटी 48 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2008 ते जानेवारी 2016 या कालावधीत वैभवनगर, पिंपरी येथे घडली.

किशोर गुरुमुखदास अहुजा (वय 49, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी 26 ऑक्टोबर 2021 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप जवाहरमल वरयानी (वय 52, रा. वैभवनगर, पिंपरी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरयानी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडून व्यवसायासाठी पैसे घेतले. फिर्यादी यांच्यासोबत भागीदारीचा करारनामा करतो आणि त्यांच्या नावाने टेंडर घेतो असे खोटे सांगून फिर्यादी यांच्याकडून दोन कोटी 48 लाख 50 हजार रुपये वेळोवेळी घेतले. ते पैसे परत न करता फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांची वरयानी यांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare